Solapur Chandrakant Dhotre | वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर जीव वाचला असता | कुटुंबीय
आकाशवाणी आमदार निवासमध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू रुग्णवाहिका नसल्याने सोलापूरमधील कार्यकर्त्याचा मृत्यू योग्य वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने चंद्रकांत धोत्रे यांचा मृत्यू आमदार विजय देशमुखांच्या नावावरील खोलीत राहत होते आकाशवाणीतल्या रूम नंबर ४०८मध्ये राहत होते रुग्णवाहिका न मिळाल्याने पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात नेलं मात्र, तोपर्यंत हा इसम दगावल्याची प्राथमिक माहिती
चंद्रकांत धोत्रे हे कोर्टाच्या कामासाठी मुंबईत आले होते त्यामुळे ते मतदारसंघातील असल्यामुळे आमदार विजय देशमुख यांच्या खोली क्रमांक ४०८ मध्ये थांबले होते. चंद्रकांत धोत्रे यांचं वय ६१ वर्ष होतं. विशाल धोत्रे जो देशमुख यांचा कार्यकर्ता आहे त्याचे वडिल होते. रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल त्यामुळे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला पण ती उपलब्ध झाली नाही. आमदार निवासनजीक असणाऱ्या पोलिसांच्या २ नंबरच्या गाडीतून जी टी रुग्णालयात नेण्यात आल मात्र त्यांना दखलपूर्व मयत घोषित करण्यात आल. चंद्रकांत धोत्रे यांच्या कुटुंबियांसाठी कोणतीही तक्रार दिलेली नाही त्यामुळे एडीआर झालेला नाही. धोत्रे यांचा मृतदेह घेऊन नातेवाईक गावी जाण्यासाठी रवाना झाले आहेत.